अबू धाबी- मागील आठवडा चेन्नई सुपर किंग्जसाठी वेदनादायी ठरला. कारण सीएसकेचे २ खेळाडूंसह आणखी ११ जण कोरोनाबाधित आढळले. यामुळे संघाचा क्वारंटाइन कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात आला. आता सीएसकेच्या खेळाडू आणि सहाय्यक सदस्यांची पुन्हा नव्याने कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
सीएसकेचा संघ यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टापची चाचणी करण्यात आली. यात १३ जण कोरोनाबाधित आढळून आले. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचा यात समावेश होता. त्यामुळे सीएसकेचा क्वारंटाइन कालावधी एक आठवड्यांनी वाढवण्यात आला. सोमवारी पुन्हा सर्व सदस्याची चाचणी करण्यात आली. यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती संघाचे सीईओ के. एस विश्वनाथन यांनी दिली.