महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2020 : चेन्नईच्या संघासाठी चाहत्यांनी बनवला खास व्हिडीओ - चेन्नई संघासाठी चाहत्यांनी बनवला व्हिडीओ

चेन्नईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काही मुलींनी एकत्र येऊन एक व्हिडीओ बनवला आहे. चेन्नईच्या संघाने फॉर्मात यावं, विजय मिळवावा आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी, यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

ipl 2020 chennai super kings fans made video for csk team
IPL 2020 : चेन्नईच्या संघासाठी चाहत्यांनी बनवला खास व्हिडीओ

By

Published : Oct 12, 2020, 10:11 AM IST

मुंबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात अद्याप चेन्नई सुपर किंग्जला लौकिकास पात्र कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईने आतापर्यंत पाच गमावले आहेत. यामुळे त्यांच्यावर कडाडून टीका होत आहे. अशात काही चाहते आपल्या संघाच्या बाजूने उभे राहिले आहे. त्यांनी चेन्नई संघासाठी एक खास व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चेन्नईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काही मुलींनी एकत्र येऊन हा व्हिडीओ बनवला आहे. चेन्नईच्या संघाने फॉर्मात यावं, विजय मिळवावा आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी, यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ १ मिनिट ५७ सेंकदाचा असून मुली यात डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच गाजत आहे. या गाण्यातील त्यांचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला असल्याचे पाहायला मिळत आहे.

चेन्नईच्या संघाने आतापर्यंत सात सामने खेळली आहेत. या सात सामन्यांपैकी त्यांना फक्त दोनच विजय मिळवता आले आहेत. त्याचबरोबर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.

हेही वाचा -RR VS SRH : राजस्थानच्या विजयानंतर परागचा भन्नाट बिहु डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा -SRH vs RR : राहुल तेवातिया आणि खलील अहमद यांच्यात भांडण, पाहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details