मुंबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी १० दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशात आयपीएल स्पर्धा वादात अडकताना पाहण्यास मिळत आहे. हा वाद आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी लाँच करण्यात आलेल्या अँथम साँगमुळे सुरू झाला आहे. प्रसिद्ध रॅपर कृष्णाने हे गाणे चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आयपीएलचे अँथम माझ्या एका रॅपमधून चोरी करण्यात आला आहे. प्रणव अजयराव मालपेने काही वर्षांपूर्वी आलेल्या माझ्या रॅप साँगची कॉपी केली आहे, असे रॅपर कृष्णाचे म्हणणे आहे. म्यूझिक डायरेक्टर अजयराव मालपेने आयपीएलच्या या हंगामासाठी 'आऐंगे हम वापस' हे अँथम साँग तयार केले आहे.
कृष्णाच्या म्हणण्यानुसार, हे गाणे त्याच्या 2017 साली आलेल्या 'देख कौन आया वापस'ची कॉपी आहे. याविषयावर कृष्णाने संताप व्यक्त केला असून तो म्हणाला, आयपीएल आणि हॉटस्टार सारख्या मोठ्या कंपन्या परवानगी न घेता, माझ्या गाण्याची कॉपी करत आहेत. ही बाब चुकीची आहे. माझी मॅनेजमेंट टीम आणि लीगल टीम याबाबत कारवाई करण्याच्या तयारीत आहे.