मुंबई- आयपीएलच्या १३ हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच सुरेश रैनाने अचानक माघार घेत चेन्नई सुपर किंग्जला धक्का दिला. रैनानंतर आता रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघातील एका खेळाडूंने आयपीएलमधून माघार घेतली आहे. विराट कोहलीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आरसीबीचा २६ वर्षीय स्टार गोंलदाज केन रिचर्ड्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आरसीबीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. रिचर्ड्सनने कौटुंबीक कारणासाठी माघार घेतली आहे. रिचर्ड्सनची पत्नी गरोदर असून तो लवकरच बाप होणार आहे. यामुळे त्याने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी माघार घेतली आहे. आरसीबीने २०१६ मध्ये रिचर्ड्सनला आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या लिलावात आरसीबीने रिचर्ड्सनला चार कोटी रुपयात खरेदी केले होते.
रिचर्ड्सनच्या जागेवर 'या' खेळाडूची वर्णी -