मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार असल्याचे, गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं आहे. चाहत्यांमध्ये या हंगामाची उत्सुकता आहे. पण स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच आजपर्यंत महत्वाच्या ७ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. असे असताना देखील प्रत्येक संघात शतकी खेळी करू शकणारे युवा फलंदाज आहेत. यात कोणते परदेशी युवा खेळाडू शतक करु शकतील, याबाबतचा हा आढावा...
टॉम बॅन्टन (केकेआर ) -
ख्रिस लिनला सोडल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२०साठी आपल्या संघात टॉम बॅन्टनचा समावेश केला. सध्याच्या घडीला बॅन्टन सुसाट फॉर्मात आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये दमदार खेळ करत धावा जमवल्या आहेत. याशिवाय त्याने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतही आपली छाप सोडली आहे. त्याने पहिल्या सामन्यात खेळताना ४२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. बॅन्टन केकेआरकडून सलामीला उतरत शतक झळकावू शकतो.