महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सुनील छेत्री पोहोचला आरसीबीच्या सराव शिबिरात - sunil chhetri

विराट आणि सुनील हे बऱ्याच दिवसांपासूनचे मित्र आहेत. काही दिवसांपासून सुनीलदेखील विराट कोहलीसारखे शाहकारी बनला आहे.

सुनील छेत्री - विराट कोहली

By

Published : Mar 21, 2019, 6:48 PM IST

बंगळुरू - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचे बंगळुरू संघाशी खास नाते आहे. विराट कोहली रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार आहे तर छेत्री इंडियन सुपर लीग संघाचा कर्णधार आहे. नुकतेच त्या दोघांची भेट बंगळुरू संघाच्या सराव शिबिरात झाली. त्या भेटीनंतर विराटने छेत्रीचे आभार मानले.

नुकतेच आयएसएलचा किताब जिंकला आहे. तर विराट कोहलीला एकदाही आयपीएलचा किताब जिंकता आला नाही. रॉयल चॅलेजर्स बंगळुरूच्या संघाने अधिकुत ट्वीटर हँडलवर सुनील छेत्रीचे आरसीबीच्या खेळाडूंसोबतचे फोटो शेयर केले आहे. कर्णधार विराट कोहलीने सुनील छेत्रीसोबतचा एक फोटो शेयर केला आहे.

विराट आणि सुनील हे बऱ्याच दिवसांपासूनचे मित्र आहेत. काही दिवसांपासून सुनीलदेखील विराट कोहलीसारखे शाहकारी बनला आहे.

सुनील छेत्री म्हणाला की, मी विराटपासून प्रेरणा घेत शाकाहारी झालो आहे. आधी खूप मटण खायचो. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा फुटबॉलवर किंवा जेवणाविषयी चर्चा होत असते. आता मांसाहारापासून खूप दूर गेल्याचे सुनीलने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details