महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिल्ली-पंजाब आमने-सामने, गुणतालिकेत आघाडी घेण्याची दोन्ही संघाना संधी - match preview

गुणतालिकेत दोन्ही संघाच्या खात्यात १० गुण आहेत. मात्र, रनरेटमध्ये सरस ठरल्याने दिल्लीच्या संघाला तिसरे तर पंजाबला चौथे स्थान देण्यात आले आहे.

दिल्ली-पंजाब आमने-सामने

By

Published : Apr 20, 2019, 1:47 PM IST

दिल्ली - आयपीएलच्या आज ३७ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आमने-सामने येणार आहेत. हा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर रात्री ८ वाजता खेळण्यात येणार आहे. तर आजच्या दिवसातील पहिला सामना दुपारी ४ वाजता राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळण्यात येईल.


दिल्लीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडापासून पंजाबच्या फलंदाजांना सावधान रहावे लागणार आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये रबाडाने दिल्लीकडून खेळताना ९ सामन्यांमध्ये सर्वाधिक १९ विकेट घेतले आहेत. तर फलंदाजीत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आणि शिखर धवन हे फलंदाजही फॉर्मात असल्याने पंजाबची डोकेदुखी वाढणार आहे.


पंजाबच्या फलंदाजीची जबाबदारी ही लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्यावर असेल. यांच्या व्यतिरीक्त सॅम कूरन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि कर्णधार रवीचंद्रन अश्विन यांच्याकडूनही संघाला गोलंदाजीत मोठ्या अपेक्षा असतील.
गुणतालिकेत दोन्ही संघाच्या खात्यात १० गुण आहेत. मात्र, रनरेटमध्ये सरस ठरल्याने दिल्लीच्या संघाला तिसरे तर पंजाबला चौथे स्थान देण्यात आले आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत आघाडी घेण्याची दोन्ही संघाना संधी असणार आहे.


दिल्ली कॅपिटल्स - श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारू अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.


किंग्ज इलेव्हन पंजाब - रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग, ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोजेस हेन्रीक, निकोलास पूरन, वरुण चक्रवर्थी , सॅम करन, मोहम्मद शमी, सर्फराज खान, हार्डस विलजोन, अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन.

ABOUT THE AUTHOR

...view details