नवी दिल्ली - दिल्लीत प्रदुषण संर्दभातील आयोजित बैठकीला दांडी मारल्याने, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपचा खासदार गौतम गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यावर गंभीरने मात्र मला शिव्या देऊन जर दिल्लीतील प्रदूषण कमी होत असेल तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या, असे म्हणत ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीच्या प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्ली सरकारने राज्याचे सर्व खासदार व एमसीडी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गंभीरने दांडी मारली. यामुळे नेटीझन्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली.
गौतम गंभीर सध्या भारत विरुद्ध बांगलादेशच्या कसोटी सामन्यात समालोचनची भूमिका निभावतो आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि निवेदक जतिन सप्रू यांच्यासोबत इंदूरमध्ये जिलेबीवर ताव मारतानाचा गंभीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
एकीकडे भारत-बांगलादेश सामन्यात मयंक अग्रवालने द्विशतक झळकावत नेटिझन्सची वाहवा मिळवली. तर दुसरीकडे गंभीरला प्रदुषणाच्या बैठकीला दांडी मारत जिलेबीवर ताव मारतानाच्या फोटोमुळे ट्रोल व्हावे लागले. पाहा या संदर्भातील 'ईटीव्ही भारत'चा विशेष वृत्तांत...
गंभीरच्या जिलेबी प्रकरणावर ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत...