मुंबई- क्रिकेट जगतामध्ये खेळाडू त्यांच्या हटक्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. यात भारतीय खेळाडूही मागे नाहीत. लांब केस ही महेंद्रसिंह धोनीची खऱ्या अर्थाने ओळख होती. लांब केसामुळेच त्याने साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. पण भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवन डोक्यावर केस का ठेवत नाही? याबद्दल कोणालाच माहिती नाही. खुद्द धवननेच याचा खुलासा केला आहे.
धवनने त्यांच्या चाहत्याशी इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. या दरम्यान त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो चाहत्यांना म्हणाला की, जे विचारायचे आहे ते विचारा. यावेळी एका चाहत्याने धवनला प्रश्न विचारला की, 'तू तुझ्या डोक्यावरील केस का वाढवत नाही? यावर धवनने, मी केस वाढवत नाही. याचे कारण केस नसताना मी अधिक चांगला दिसतो आणि केस कमी असतील तर शाम्पूही कमी लागतो. असे उत्तर दिले.
धवनला आणखी एका चाहत्याने विचारले की, तू इतक्या चांगल्या प्रकारे फलंदाजी कशाप्रकारे करतो? यावर बॅटने असे उत्तर धवनने दिले. एका चाहत्याने त्याला त्याचा गब्बर हे नाव कोणी दिले असा प्रश्न विचारला. यावर धवन उत्तर देत म्हणाला की, गब्बर हे नाव मला माझे रणजी प्रशिक्षक विजय दहिया यांनी दिल्याचे सांगितले.