अहमदाबाद - बीसीसीआयने म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा फोटो शेअर केला होता. अहमदाबादमधील 'मोटेरा क्रिकेट स्टेडियम'चा फोटो व्हायरल झाल्यानंतर, या स्टेडियमच्या आतील भागाचा व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा -आयपीएलपेक्षा ६ पटीने कमी आहे पाकिस्तानच्या टी-२० लीगच्या बक्षीसाची रक्कम!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी या स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरु आहे. या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार आहे.
या स्टेडियमआधी, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जात होते. मात्र, मेलबर्न आता दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर कोलकाताच्या इडन गार्डन्सचा क्रमांक लागतो. मेलबर्नची आसनव्यवस्था एक लाख असून इडन गार्डन्सची आसनव्यवस्था ६६ हजार इतकी आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोटेराला भेट देऊन पाहणी केली. याच ठिकाणी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.