डरबन - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिले ३ सामने जिंकून आफ्रिकेने ही मालिका आपल्या नावावर यापूर्वीच केली आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल परेरा दुखापतीमुळे उरलेल्या २ सामन्यातून बाहेर पडला आहे, अशी माहिती श्रीलंकंन क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.
श्रीलंकेला मोठा धक्का, वनडे मालिकेतून कुसल परेरा बाहेर
श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल परेरा दुखापतीमुळे उरलेल्या २ सामन्यातून बाहेर
Kusal Perera
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कुसल परेरा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो या सामन्यात फलंदाजीसही उतरला नव्हता. यापूर्वी उभय संघात झालेल्या कसोटी मालिकेतील डरबन कसोटीत कुसल परेराने मॅचविनिंग खेळी करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते.
या मालिकेतील चौथा वनडे सामना पोर्ट एलिझाबेथ येथे १३ मार्चला सेंट जॉर्जेस ओव्हल मैदानावर खेळण्यात येईल. तर अखेरचा सामना १६ मार्चला केप टाउन येथे खेळविला जाईल.