तिरुवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यासाठी तिरुवनंतपुरमच्या विमानतळावर जेव्हा भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे आगमन झाले, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत केले. याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओत, सॅमसन विमानतळावरुन भारतीय संघाच्या बसमध्ये बसण्यासाठी निघाला होता. त्यावेळी विमानतळावर जमलेल्या चाहत्यांची त्याच्या नावाने घोषणाबाजी करण्यात सुरूवात केली. यावेळी त्यानेही बसमध्ये चढल्यानंतर हात हलवून आणि हात जोडून चाहत्यांचे स्वागत स्वीकारले.
सॅमसनचे तिरुवनंतरपुरमचे स्टेडियम हे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याला अंतिम संघात संधी मिळावी, अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऋषभ पंतला अंतिम संघात स्थान दिले.