महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India Vs West Indies : वानखेडेच्या विजयात 'हे' खेळाडू ठरले हिरो - भारताचा वेस्ट इंडीजवर मालिका विजय

भारतीय संघाने बुधवारी वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ६७ धावांनी बाजी मारली आणि ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेवर २-१ ने कब्जा केला. भारताच्या या विजयात काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली पाहुयात त्यांच्याविषयी...

Indvswi : Five heroes of team India to beat West Indies at Wankhere
India Vs West Indies : वानखेडेच्या विजयात 'हे' खेळाडू ठरले हिरो

By

Published : Dec 12, 2019, 4:27 PM IST

मुंबई - भारतीय संघाने बुधवारी वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ६७ धावांनी बाजी मारली आणि ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेवर २-१ ने कब्जा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २४० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजचा संघ भारतीय भेदक माऱ्यासमोर १७३ धावा करू शकला.


रोहित शर्मा -

भारतीय सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात ३४ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, रोहितने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. रोहितने आपले अर्धशतक अवघ्या २३ चेंडूत पूर्ण केले. रोहितचे हे टी-२० कारकिर्दीतील १९ वे अर्धशतक ठरले.

रोहित शर्मा

केएल राहुल -

भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज केएल राहुल या सामन्यात शतक झळकवण्यात अपयशी ठरला. तो व्यक्तिगत ९१ धावांवर बाद झाला. राहुलने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९१ धावा केल्या. त्याने रोहितसोबत १३५ धावांची सलामी दिली.

के एल राहुल

विराट कोहली -

रोहित आणि राहुलच्या दमदार भागिदारीनंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्फोटक फलंदाजी केली. त्याने २९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७० धावा झोडपल्या. महत्त्वाचे म्हणजे विराटने आपले अर्धशतक २१ चेंडूत पूर्ण केले. विराटच्या ७० धावांच्या मोबदल्यात भारतीय संघाने विंडीजसमोर धावांचा डोंगर उभारला.

विराट कोहली

मोहम्मद शमी -

तब्बल दोन वर्षांनंतर टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेला भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चार षटकाची गोलंदाजी केली. त्यात त्याने २५ धावा देत २ गडी बाद केले. दरम्यान, शमीने ९ जुलै २०१७ मध्ये विंडीज विरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता.

मोहम्मद शमी

दीपक चहर -

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गडी बाद करण्याची हॅट्ट्रिक नावावर असलेल्या चहरने या सामन्यात ४ षटकात २० धावा देत २ गडी बाद केले.

दीपक चहर

ABOUT THE AUTHOR

...view details