अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. आता आज होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजीत सुधारणेसह मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे.
आजच्या सामन्यात के. एल. राहुल आणि शिखर धवन यांच्याकडून चांगल्या सलामीची आपेक्षा भारतीय संघाची असेल. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीला देखील मोठी खेळी करावी लागेल. तर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून स्फोटक खेळीची आपेक्षा तर खुद्द विराटने बोलून दाखवली आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि हार्दिकवर वेगवान माऱ्याची तर अक्षर पटेल, चहल आणि वॉशिंग्टन सुंदरवर फिरकीची भिस्त असणार आहे.
दुसरीकडे इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर चांगली कामगिरी नोंदवली. जोफ्रा आर्चरने पहिल्या टी-२० सामन्यात तीन विकेट घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले होते. तर फलंदाजीत रॉयने फटकेबाजी केली होती. अशाच कामगिरीची आपेक्षा इंग्लंडचा संघ करत असेल.
भारतीय संघ -