इंदूर- भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १ डाव १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या एका जबरा फॅनची भेट घेतली. या फॅनचे नाव पूजा आहे.
भारतीय संघाने बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. सामना संपल्यावर भारतीय खेळाडू पॅव्हेलियनमधून बाहेर पडत होते. त्यावेळी तिथे विराटची एक चाहती बसली होती.
ती चाहती पूजा असून तिला एका दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या आजारामुळे तिची हाडे मोडतात. पण मोडलेली हाडे पुन्हा एकादोन दिवसात पुन्हा आपोआप जोडली जातात. शाळेत जर शिक्षिकेने पुजाला हात पकडून उभे केले. त्यावेळी पुजाची हाडे आपोआप मोडली आणि जोडलीही गेली. त्यामुळे पूजा जास्त करून घराबाहेर पडत नाही. पण ती विराटला पाहण्यासाठी खास होळकर मैदानावर आली होती.