मुंबई- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला ३ डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, २६ डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि ३ जानेवारी २०२१ मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नियोजित आहे. पण कोरोनामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. जर विश्वकरंडक झाल्यास भारतीय संघ ऑक्टोबरमध्येच ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होईल.