हैदराबाद -येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विंडीजविरूद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताच्या के. एल. राहुलला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
हेही वाचा -#HBDJaspritBumrah : आईचा ओरडा खाल्यामुळे बुमराह ठरला 'यॉर्कर किंग'
या सामन्यात राहुलने २६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक हजार धावांचा टप्पा पार करेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे. राहुलने ३१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांसह ९७४ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू -
२५३९ धावा - रोहित शर्मा
२४५० धावा - विराट कोहली
१६१७ धावा - एमएस धोनी