मुंबई- टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करतो आहे. रोहितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे सारे चाहते आणि संघ सहकारी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. मुंबई इंडियन्स संघानेही आपल्या लाडक्या कर्णधाराला काहीशा हटक्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने ट्विटच्या माध्यमातून रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित, तुला अजून जास्त चौकार, षटकार, नवनवे विक्रम आणि खूप साऱ्या ट्रॉफी मिळोत, अशा आशयाच्या शुभेच्छा त्यांनी लाडक्या कर्णधाराला दिल्या आहेत.
दरम्यान, रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे दीर्घ काळापासून प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ पैकी ३ विजेतेपदांवर नाव कोरले. आयपीएलच्या २०१३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना तर २०१५, २०१७ आणि २०१९ च्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना त्याने विजेतेपदाची चव चाखली.