महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

#HBD ZAK : झहीर खान झाला ४१ वर्षांचा, वडिलांनी सांगितले होते अभियांत्रिकी सोडून क्रिकेट खेळ - झहीर खान झाला ४१ वर्षांचा

आज झहीर खानचा आज ४१ वा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे ७ ऑक्टोबर १९७८ ला झहीरचा जन्म झाला. 'झॅक' असे टोपणनाव असलेल्या झहीरने २००० ते २०१४ पर्यंत टीम इंडियाच्या गोलंदाजीची मदार सांभाळली.

#HBD ZAK : झहीर खान झाला ४१ वर्षांचा, वडिलांनी सांगितले होते इंजीनियरींग सोडून क्रिकेट खेळ

By

Published : Oct 7, 2019, 11:50 AM IST

मुंबई -२०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत अफलातून गोलंदाजीचे योगदान देणाऱ्या झहीर खानचा आज ४१ वा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे ७ ऑक्टोबर १९७८ ला झहीरचा जन्म झाला. 'झॅक' असे टोपणनाव असलेल्या झहीरने २००० ते २०१४ पर्यंत टीम इंडियाच्या गोलंदाजीची मदार सांभाळली.

झहीर खान

हेही वाचा -आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेले खास विक्रम एका क्लिकवर

क्रिकेटमध्ये पदार्पण -

झहीरच्या वडिलांनी क्रिकेटमध्ये येण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांनीच झहीरला अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून क्रिकेटला प्राधान्य देण्यास सांगितले होते. त्यानंतर झहीर मुंबईमध्ये ज्युनियर क्रिकेट खेळू लागला. ज्युनियर क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केल्यानंतर, त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून संधी मिळाली. २०००-०१ मध्ये रेल्वेविरुद्ध खेळलेल्या रणजी सामन्यात त्याने १४५ धावांमध्ये ८ बळी घेत सामनावीराचा मान पटकावला होता.

केनिया विरुद्ध पदार्पण -

भारतीय संघासाठी झहीर खानने केनिया विरुद्ध पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने तीन बळी घेतले. याच वर्षी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात झहीरने स्विंग गोलंदाजीचे अफलातून दर्शन घडवले होते. झहीरने आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ, लंकेचा कुमार संगकारा, सनथ जयसूर्या आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन यांना १० पेक्षा अधिक वेळा तंबूत धाडले आहे.

झहीरचा 'नकल बॉल' -

२००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना झहीरने ७५ धावा फटकावल्या होत्या. २००८ मध्ये त्याला 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हल्ली क्रिकेटमध्ये वापरण्यात आलेला 'नकल बॉल' हे झहीरचे अस्त्र आहे. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने 'नकल बॉल'चा वापर केला होता.

झहीरची क्रिकेट कारकिर्द -

भारतासाठी झहीरने ९२ कसोटी सामने खेळताना ३११ बळी घेतले. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २८२ बळी टिपले आहेत. भारताला २००३ मध्ये उपविजेता आणि २०११ मध्ये विश्वविजेता बनवण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा आहे. झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details