लंडन - इंग्लंड आणि वेल्समध्ये १ जुलैपर्यंत क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जाणार नाहीत, असे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रस्तावित इंग्लंड २५ जूनपासून तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय संघ दोन आठवड्यांच्या इंग्लंड दौर्यावर चार एकदिवसीय आणि दोन टी -२० सामने खेळणार होता.
उभय संघांमध्ये टॉन्टन आणि ब्रिस्टल येथे दोन टी -२० तर वर्सेस्टर, चेल्म्सफोर्ड, सेंटरबरी आणि होव येथे चार एकदिवसीय सामने खेळले होते. ९ जुलै रोजी हा दौरा संपणार होता.