महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय महिला खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी विचारणा, दोघांविरोधात गुन्हा दाखल

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने दोन व्यक्तींविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. याची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमख अजितसिंह शेखावत यांनी दिली.

भारतीय महिला खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी विचारणा, गुन्हा दाखल

By

Published : Sep 16, 2019, 11:49 PM IST

Updated : Sep 16, 2019, 11:57 PM IST

नवी दिल्ली - भारताच्या एका महिला क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगसाठी विचारणा करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे समजते. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सोमवारी याबाबतची माहिती दिली.

याबाबत बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने दोन व्यक्तींविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. याची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमख अजितसिंह शेखावत यांनी दिली.

याप्रकरणी बोलताना शेखावत यांनी सांगितले की, भारताच्या महिला क्रिकेटपटूने फिक्सिंगसाठी विचारणा झाली असल्याचे माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली. त्यानंतर या गोष्टीचा तपास सुरू करण्यात आला आहे. आयसीसी या प्रकरणाचा तपास करत आहे.'

तसेच त्यांनी खेळाडूने या घटनेची माहिती देऊन चांगला काम केल्याचेही शेखावत म्हणाले, दरम्यान, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलिसांची मदत मागितली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांना राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली आहे.

Last Updated : Sep 16, 2019, 11:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details