झारखंड - राज्यातील कोडरमा जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय संघाची सदस्य असलेली एक महिला क्रिकेटपटू बेपत्ता झाली आहे.
हेही वाचा -नवीन प्रायोजक 'बायजू'सोबत विराटसेना आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार

या महिला क्रिकेटपटूचे नाव अंशु यादव असे आहे. अंशु ही भारताच्या टेनिस बॉल क्रिकेट संघाची खेळाडू होती. कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो येथील अंशु रहिवासी होती. ती सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र अंशु घरी परतलीच नाही. पोलीस यंत्रणा तिचा तपास करत आहेत.
हेही वाचा -wonder boy!..१८ वर्षाच्या लक्ष्य सेनने जिंकली बेल्जियम ओपन स्पर्धा
अद्याप पोलिसांना तिच्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. पोलीस संभाव्य ठिकाणी तिची चौकशी करत आहेत. अंशु बेपत्ता झाल्यानंतर, पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलीस तपास करत आहेत.