मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, क्वींसलँड राज्याने, लॉकडाऊनची नियमावली कडक केली होती. यामुळे हा सामना ब्रिस्बेनमध्ये होणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती.
क्वींसलँड राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे तेथील सरकारने सिडनीहून किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाइनच्या नियमाचे पालन करावे लागेल, असे जाहीर केले होते. हा क्वारंटाइन १४ दिवसांचा होता. तसेच ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेनचे रुग्ण देखील आढळले होते. यामुळे हा परिसरात तीन दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. या सर्व कारणामुळे उभय संघातील सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.