वेलिंग्टन- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्याच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तालयात गेले होते. ऋषभ पंत आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
रवि शास्त्री यांनी भारतीय उच्चायुक्तालयात आल्यानंतर मला नेहमी घरी आल्यासारखं वाटतं असे म्हटलं आहे.
भारतीय उच्चायुक्तालयात आल्यानंतर विराट कोहलीने सांगितले की, 'मला येथे येऊन बर वाटलं. आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. कारण आम्ही जेव्हा घरापासून दूर असतो. तेव्हा आम्हाला उच्चायुक्तालयात येऊन घरी आल्यासारखं वाटत आहे.'
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरू होणार आहेत.