मॅचेस्टर- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीयांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या या पराभवाने खेळाडू आणि चाहते दुःखात बुडाले आहेत. खेळाडूंनी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट केली आहे. कर्णधार विराटने एक ट्विट करत म्हणलं की, आम्ही जितकं करु शकत होतो, ते आम्ही केले.
सर्वप्रथम मी सर्व चाहत्याचे आभार मानतो. तुम्ही आमच्या सोबत राहून आमचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी आलात. ही स्पर्धा तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी अविस्मरणीय केली. आम्ही सर्वजण तुमच्यासारखेच खूप नाराज आहोत. आम्हाला जिंकण्यासाठी जे काही करता येण शक्य होतं ते आम्ही केलं, अशा आशयाचा ट्विट विराटने केले आहे.
विराटबरोबर संघातील खेळाडू रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि स्पर्धेत दुखापत झालेला खेळाडू शिखर धवनने ही ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.