मुंबई - दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या आयसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारताचा संघ शुक्रवारी रवाना झाला. येत्या 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा विश्वकरंडक खेळेल.
भारत हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकाचा गतविजेता आहे. त्यामुळे यावर्षीच्या संघाकडून क्रिकेट चाहत्यांना आणि निवड समितीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहेत. गुरूवारी झालेल्या आयपीएल लिलावात एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघातील बऱ्याच खेळाडूंची निवड झालेली आहे.
हेही वाचा - द्रविडच्या मुलाची चमकदार कामगिरी, एकाच सामन्यात केला 'हा' कारनामा
विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाबे यांच्यात मालिका देखील खेळणार आहे.
जानेवारी 2020 मध्ये होणारा हा तेरावा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक असून, दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्यांदा याचे आयोजन होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघ सहभागी होणार आहेत. सोळा संघांचे चार गटांत विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील टॉपचे दोन संघ सुपर लीगसाठी खेळतील.
एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारतीय संघ - यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिलक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार- उत्तर प्रदेश), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक-उत्तर प्रदेश), शाश्वत रावत (बडोदा), दिव्यांश जोशी (मिझोरम), शुभांग हेगडे (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (उत्तर प्रदेश), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक-झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटील (कर्नाटक)