नवी दिल्ली -भारताचा अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीला उजाळा दिला आहे. या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात मिश्राने सचिन तेंडुलकरबरोबर फलंदाजी केली होती. ही गोष्ट कसोटी कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षणांमध्ये गणली जाते, असे मिश्राने सांगितले.
''सचिनसोबत फलंदाजी हा कसोटीतील अविस्मरणीय क्षण'' - memorable test moment mishra news
लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिश्राने पहिल्या डावात 43 आणि त्यानंतर दुसऱ्या डावात 84 धावा केल्या. यावेळी त्याने सचिनसोबत फलंदाजी केली होती. या डावात सचिनने 91 धावांची खेळी केली. मात्र, या सामन्यात भारत पराभूत झाल्याने या दोघांचे प्रयत्न वाया गेले.

आपल्या आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या इंस्टाग्रामवर बोलताना मिश्रा म्हणाला "सचिन पाजीबरोबर फलंदाजी करण्याचा मला अभिमान आहे. मला वाटते की हा माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. दुसर्या डावात आम्हाला फॉलोऑन मिळाला होता. आणि पराभव टाळण्यासाठी आम्हाला खेळावे लागले. मी नाईट वॉचमनप्रमाणे गेलो आणि सचिनने संपूर्ण डावात मला मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात आम्ही सुरुवात करणे महत्त्वाचे होते आणि मी 84 धावा केल्या. पण मला कसोटी सामना गमावल्याची खंत वाटते."