मोहाली - आयपीएलमध्ये आज पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आय.एस. बिंद्रा मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होणार आहे. पंजाबने मागच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून पराभवाच्या हॅट्रिकपासून वाचण्याचे आव्हान किंग्ज इलेव्हनसमोर असणार आहे. राजस्थान आणि पंजाब यांचा हा दुसरा सामना असून यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला होता.
राजस्थानकडे बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ यांसारखे चांगले फलंदाज आहेत. मात्र, आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थानची फलंदाजी समाधानकारक झाली नसल्याने संघाला ७ पैकी ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे रॉयल्सचा संघ गुणतालिकेत ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या गोलंदाजीची जबाबदारी जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट आणि धवल कुलकर्णी यांच्यावर असेल.
अश्विनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबकडे ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांसारखे स्फोटक फलंदाज आहेत. या सत्रात या दोघांनीही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर या दोघांना लवकर बाद करण्याचे आव्हान असणार आहे. पंजाबच्या गोलंदाजीची मदार ही सॅम कुरन, मोहम्मद शमी, अँड्र्यू टाय आणि रवीचंद्रन अश्विन यांच्यावर असेल.
किंग्ज इलेव्हन पंजाब -रवीचंद्रन अश्विन (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग, ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, मोजेस हेन्रीक, निकोलास पूरन, वरुण चक्रवर्थी, सॅम करन, मोहम्मद शमी, सर्फराज खान, हार्डस विलजोन, अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन.
राजस्थान रॉयल्स -अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोधी, जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन, ओशान थॉमस, शशांक सिंग, लियाम लिव्हिनस्टोन, शुभम राजाने, मनन वोहरा, ऍश्टन टर्नर, रियान पराग.