महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या जलद गोलंदाजानं घेतली क्रिकेटमधून निवृत्ती - सुदीप त्यागीची क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा जलद गोलंदाज सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून घेतली.

indian pacer sudeep tyagi announces retirement from all format of cricket share emotional post on twitter
धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या जलद गोलंदाजानं घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

By

Published : Nov 18, 2020, 4:25 PM IST

मुंबई - भारताचा जलद गोलंदाज सुदीप त्यागीने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याची घोषणा त्याने ट्विटच्या माध्यमातून केली. यात त्याने महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद कैफ, आरपी सिंह आणि सुरेश रैना यांचे आभार मानले आहेत.

सुदीप त्यागीने ४ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने ३ विकेट घेतल्या. या शिवाय त्याने भारतीय संघाकडून एक टी-२० सामना खेळला आहे. त्याने भारताकडून अखेरचा सामना २०१० मध्ये खेळला होता.

आयपीएलमध्ये सुदीप चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघाकडून १४ सामने खेळला आहे. याशिवाय सुदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४१ प्रथम श्रेणी सामन्यात १०९ विकेट घेतल्या. तर २३ लिस्ट ए सामन्यात ३१ विकेट त्याच्या नावे आहेत.

काय म्हणाला सुदीप...

एका खेळाडूचे जे स्वप्न असते ते पूर्ण करण्यासाठी मी सर्व काही केले. देशाचे प्रतिनिधित्व केले. मी महेंद्रसिंह धोनीचे आभार व्यक्त करतो. त्याच्या नेतृत्वाखाली मला पहिला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याच बरोबर मी मोहम्मद कैफ, आरपी सिंह आणि सुरेश रैना यांचे आभार मानतो, असे सुदीप त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यासोबत त्याने, मी आतापर्यंत जितके निर्णय घेतले. त्यापैकी निवृत्ती हा सर्वात अवघड निर्णय होता. माझ्या स्वप्नांना गुडबाय म्हणतोय, असे देखील म्हटलं आहे.

हेही वाचा -टीम इंडियाचे २०२१चे वेळापत्रक आले समोर, खेळाडू राहणार व्यस्त

हेही वाचा -IND vs AUS: क्रिकेट मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला जबर झटका; वेगवान गोलंदाजाने घेतली माघार

ABOUT THE AUTHOR

...view details