मोहाली - आयपीएल फ्रेंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू निकोलस पूरनला हिंदी शिकवत आहे.
पंजाबने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शमी पूरनला 'तू कुठे जात आहेस' असे म्हणायला शिकवत आहे. ''हिंदीचा धडा, निक्की प्रा'', असे पंजाबने या शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
2018च्या हंगामात पंजाबने निकोलस पूरनला 4.20 कोटीमध्ये संघात दाखल करून घेतले होते. 2019 च्या हंगामात, त्याने संघासाठी 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 28 च्या सरासरीने 168 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 157 होता. आपल्या देशासाठी पूरनने 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 49.05 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. तर 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 23.53 च्या सरासरीने 353 धावा केल्या आहेत.
शमीलाही पंजाबने 2018 मध्ये 4.80 कोटीमध्ये खरेदी केले होते. 2019 मध्ये त्याने आयपीएलचे 14 सामने खेळले. या सामन्यात त्याने 19 बळी घेतले.