मुंबई -भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने युवराज सिंगचे 'स्टे होम' चॅलेंज पूर्ण केले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, हा लॉकडाऊन तब्बल तीन वेळा वाढवण्यात देखील आला आहे. जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे सारेच कंटाळले आहेत. खेळाडूही आपापल्या घरी बसून कंटाळले आहे. त्यामुळे हल्ली क्रिकेटपटू एकमेकांना घरातच चॅलेंज देताना दिसून येत आहेत.
VIDEO : हिटमॅनकडून अनोख्या पद्धतीत 'चॅलेंज' पूर्ण - rohit sharma latest news
रोहितने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रोहितने हे चॅलेंज पूर्ण केल्याचे सांगत रिषभ पंत, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांना नॉमिनेट केले आहे.
रोहितने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रोहितने हे चॅलेंज पूर्ण केल्याचे सांगत रिषभ पंत, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांना नॉमिनेट केले आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने सोशल मीडियावर #KeepItUpchallenge ही मोहीम सुरू केली आहे. युवीने एक व्हिडिओच्या माध्यमातून, बॅट उभी धरून बॅटच्या कडेने (edge) चेंडू शक्य तितक्या वेळ टोलवत राहणे, असे चॅलेज दिले आहे. त्याने त्यासाठी मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना नॉमिनेट केले होते. सचिन आणि हरभजननंतर रोहित शर्माने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. युवराजचे हे चॅलेज सुरुवातीला हरभजनने पूर्ण केले. त्यानंतर सचिन तेंडुलकरने तर डोळ्यावर पट्टी बांधून युवीचे चॅलेज पूर्ण केले.