महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दीपिका, अनुष्कामध्ये हॉट कोण.. या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने दिले 'हे' उत्तर - आलिया भट

जसप्रीत बुमराहची एका यु-ट्युब वाहिनीसाठी मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये बुमराहला अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण यामध्ये जास्त हॉट कोण? आणि तुला दोघांमध्ये कोण आवडते ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नावर बुमराहला काय उत्तर द्यावे हे सुचेना.

दीपिका अनुष्कामध्ये हॉट कोण, या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने दिले 'हे' उत्तर

By

Published : Sep 10, 2019, 11:28 PM IST

नवी दिल्ली - भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने क्रिकेट मैदानात भल्या-भल्या फलंदाजाच्या दांड्या गुल केल्या आहेत. मात्र, बुमराहचीच एका ठिकाणी भंबेरी उडाल्याचे उघड झाले. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल नेमकं काय झालं असेल ?

हेही वाचा -'या' कारणामुळे कुलदीप, चहलला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून वगळले - प्रसाद

झाले असे की, जसप्रीत बुमराहची एका यु-ट्युब वाहिनीसाठी मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये बुमराहला अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण यामध्ये जास्त हॉट कोण? आणि तुला दोघांमध्ये कोण आवडते ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नावर बुमराहला काय उत्तर द्यावे हे सुचेना.

तेवढ्यात अँकरने अनुष्का शर्मा कोण आहे माहित आहे ना? असे सांगत बुमराहला आणखी अडचणीत आणले. तेव्हा मात्र, बुमराहने या प्रश्नामधून आपली सुटका करून घेतली. बुमराह म्हणाला, तुम्ही दिलेले पर्याय सुरक्षित नाहीत असे सांगत तो सही या प्रश्नातून सहीसलामत बाहेर पडला.

हेही वाचा -स्टिव्ह स्मिथ 'सुपरफास्ट'...विराटसाठी कसोटीत अव्वल स्थान कठीण

यानंतर अँकरने पुन्हा बुमराहला आलिया भट आणि परिणीती चोप्रा यांच्यामध्ये कोण हॉट वाटते, हा प्रश्न विचारला. तेव्हा बुमराह मी आलियाचे काही फोटो आणि सिनेमे पाहिले असल्याचे सांगितले. त्यावर अॅकरने पुन्हा त्याला विचारले की तुला आलिया आवडते का तर यावर बुमराहने पुन्हा मी आलियाचे काही फोटो आणि सिनेमे पाहिले असल्याचे सांगितले.

दरम्यान, जसप्रीत बुमराह यांच्यावर टी-२० चा गोलंदाज असा शिक्का बसला होता. मात्र, त्याने वेस्ट इंडीज विरुध्दच्या कसोटी सामन्यात हॅट्रिक गडी बाद करत हा शिक्का पुसला आहे. वेस्ट इंडीज विरुध्दच्या मालिकेनंतर बुमराह आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये ३ ऱ्या स्थानावर विराजमान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details