मुंबई - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याला एका चाहत्याने रोहितविषयी एका शब्दात सांगायचे झाल्यास तु काय सांगशील? असा प्रश्न केला. यावर अख्तरने, मार्केटमध्ये तसा शब्द आला की मी याचे उत्तर देईन, असे सांगितले.
अख्तरने चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन केले होते. यात चाहते त्याला विविध क्रिकेटपटूविषयी त्याचे मत विचारत होते. एका चाहत्याने त्याला, रोहितविषयी तु एका शब्दात काय सांगशील? असा प्रश्न केला. यावर अख्तरने, मार्केटमध्ये तसा शब्द अद्याप आलेला नाही. तसा शब्द आला की मी तुला ते सांगेन, असे उत्तर दिले.
रोहितशिवाय एका चाहत्याने विराट कोहली आणि बाबर आझमविषयी विचारले. तेव्हा बाबरला अख्तरने सर्व क्रिकेटमधील बेस्ट खेळाडू असल्याचे सांगितलं. एकाने धोनीविषयी विचारले असता, अख्तरने तो 'एक काळ' आहे, असे उत्तर दिले.