नवी दिल्ली -कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून क्रीडा क्रियाकलाप स्थगित झाल्यामुळे अनेक देशांतर्गत सामने खेळले गेलेले नाहीत. २०२०-२१ या वर्षासाठीचा देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम आता नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. शनिवारी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या शीर्ष परिषदेच्या बैठकीत खेळाडूंच्या प्रतिनिधी शांता रंगास्वामी यांनी नवीन वर्षात घरगुती क्रिकेट हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली. घरगुती क्रिकेटचा हंगाम सहसा ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान असतो.
खुशखबर..! 'या' तारखेपासून भारतात देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात - indian domestic cricket start
एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने १ जानेवारीपासून देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. शीर्ष परिषदेच्या बैठकीत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे बिघडलेल्या देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली.
खुशखबर..! 'या' तारखेपासून भारतात देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात
एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने १ जानेवारीपासून देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. शीर्ष परिषदेच्या बैठकीत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे बिघडलेल्या देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली.
गांगुलीने संकेत दिले, की बीसीसीआय रणजी ट्रॉफीसाठी जानेवारी ते मार्च यादरम्यान विंडोवर नजर ठेवून आहे. ज्युनियर क्रिकेट आणि महिला स्पर्धांचे आयोजन मार्च आणि एप्रिल यादरम्यान केले जाईल.