मुंबई - भारतीय लष्कराने 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 3 मे 1999 रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्याने या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले होते.
कारगिल विजय दिवस : भारतीय सैनिकांच्या शौर्याला क्रिकेटपटूंचा सलाम - cricketers on kargil vijay divas
भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरू होते. या युद्धातील भारतीय सैनिकांच्या शौर्याला भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी सलाम केला आहे.
यानिमित्ताने भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनाही आपल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण झाली आहे. वाचा क्रिकेटपटूंनी केलेले ट्विट् -
भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरू होते. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑपरेशन विजयची सुरुवात केली. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरण आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर पाकिस्तानला कारगिलमधून सैन्य मागे घ्यावे लागले होते.