चेन्नई -भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने गुरुवारी साखरपुडा केला. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले. वैशाली विश्वेश्वरन असे विजयच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. विजय आणि वैशालीच्या साखरपुड्यानंतर आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने या दोघांचे अभिनंदन केले आहे. आयपीएलमध्ये विजय शंकर हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.
आयपीएलपूर्वी टीम इंडियाच्या क्रिकेपटूने उरकला साखरपुडा...पाहा फोटो - indian cricketer engaged latest news
२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या निवडीदरम्यान अंबाती रायुडूकडून बरीच टीका सहन करावी लागली. विजय शंकर 'थ्रीडी' प्लेयर असल्याचे मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले होते. मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला होता. या विश्वकरंडक स्पर्धेत विजयने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल, लेगस्पिनर युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, अष्टपैलू क्रुणाल पंड्या, करुण नायर, आरसीबीचा गोलंदाज मोहम्मद सिराज, गोलंदाज सिद्धार्थ कौल आणि अभिनव मुकुंद या खेळाडूंनी विजय आणि वैशालीचे अभिनंदन केले आहे.