महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सुरेश रैनाच्या मुलीचा योगाभ्यास पाहिलात का? - suresh raina daughter yoga photo news

4 वर्षाच्या ग्रासियाचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. इतक्या कमी वयात तिची लवचिकता पाहून सर्वजण हैराण झाले आहे. ग्रासियाच्या आईने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

indian cricketer suresh raina daughter gracia yoga photos goes viral
सुरेश रैनाच्या मुलीचा योगाभ्यास पाहिलात का?

By

Published : May 15, 2020, 12:54 PM IST

Updated : May 15, 2020, 5:29 PM IST

मुंबई -भारताचा उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून सुरेश रैनाची ओळख आहे. अत्यंत चपळ, धूर्त क्षेत्ररक्षक असणाऱ्या रैनाने अनेक वेळा मैदानावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तंदुरुस्तीवरून अनेक चाहते रैनाचे नेहमीच कौतुक करत असतात. आता रैनाची मुलगी ग्रासियासुद्धा आपल्या वडिलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत आहे.

4 वर्षाच्या ग्रासियाचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. इतक्या कमी वयात तिची लवचिकता पाहून सर्वजण हैराण झाले आहे. ग्रासियाच्या आईने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसचा जोरदार फटका बसला आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे अनेक मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडू आपला वेळ कुटुंबीयांसोबत व्यतित करत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी, रैनाचा ग्रासियासोबत घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Last Updated : May 15, 2020, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details