महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'या' भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने भाजपमध्ये केला प्रवेश - राजकारण

रीवाने १७ एप्रिल २०१६ साली भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासोबत लग्न केले होते. रीवा जडेजाने रविवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकारणात उडी मारली आहे.

रीवा ११

By

Published : Mar 4, 2019, 9:50 AM IST

मुंबई- भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रीवा जडेजाने रविवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकारणात उडी मारली आहे. गुजरातचे कृषीमंत्री आर.सी फालदू आणि खासदार पूनम मदम यांच्या उपस्थितीत रीवाने भाजपमध्ये प्रवेश केला.

रीवा जडेजा घरातील एकुलती एक मुलगी आहे. रीवाचे वडील हरदेव सिंह सोळंकी मोठे उद्योगपती आणि कंत्राटदार आहेत. त्यांच्या स्वत:च्या २ खासगी शाळा आणि एक हॉटेल आहे. रीवाचे काका हरिसिंह सोळंकी गुजरातमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. रीवाची आई प्रफुलब्बा राजकोट येथे रेल्वेमध्ये कामाला आहे.

रीवाने १७ एप्रिल २०१६ साली भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासोबत लग्न केले होते. रीवाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून तिने युपीएससी परीक्षेचा अभ्याससुद्धा केला होता. गेल्या वर्षी पोलीस कॉन्स्टेबल सोबत झालेल्या मारहाणीनंतर रीवा चर्चेत आली होती. रीवाने गेल्या वर्षी रजपूत करणी सेनेतही प्रवेश केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details