जम्मू काश्मीर -काही वर्षांपूर्वी क्रिकेटविश्वाला हादरा बसला होता. भारतीय खेळाडू रमन लांबा प्रमाणे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचाही डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाला होता. आता तशाच प्रकारची आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. काश्मीरमध्ये एका चालू सामन्यात डोक्याला चेंडू लागून भारतीय फलंदाजाचा मृत्यू झाला आहे.
आणखी एक रमन लांबा हरपला; डोक्याला चेंडू लागून भारतीय फलंदाजाचा मृत्यू - getting hit by ball
जहांगिर अहमद वार असे या मृत्यूमुखी पडलेल्या १८ वर्षीय युवा फलंदाजाचे नाव आहे.

जहांगिर अहमद वार असे या मृत्यूमुखी पडलेल्या १८ वर्षीय युवा फलंदाजाचे नाव आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमधील बारामुला आणि बडगाम सामन्यादरम्यान ही घटना घडली. बारामुला संघातून जहांगिर फलंदाजी करायचा. या सामन्यामध्ये जहांगिर बाउन्सरवर फटका मारत असताना चेंडू थेट त्याच्या डोक्याला लागला. आणि तो तसाच मैदानवरच कोसळला. जहांगिरला लगेच रुग्णालयात नेण्यात आले परंतू उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जहांगिरच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी जहांगिरच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.