नवी दिल्ली -भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नवीन वर्षात सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविचसोबत साखरपुडा केला. आता हार्दिकने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नताशा गर्भवती असल्याचे हार्दिकने उघड केले आहे.
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज असलेल्या हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर नताशाबरोबर एक फोटो शेअर केला आहे. ''नताशा आणि मी मोठा प्रवास केला. आम्ही लवकरच आमच्या आयुष्यात नवीन पाहुण्याचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत'', असे हार्दिकने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले.
एकमेकांना बरेच दिवस डेट केल्यावर 31 डिसेंबर 2019 रोजी हार्दिक आणि नताशाने आपल्या प्रेमाची कबूली दिली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी त्याने साखरपुडा केला. हार्दिकने नताशाला दुबई येथे नेले. नताशाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. साखरपुड्यानंतर दोघेही एकत्र राहत आहेत. नताशा सर्बियन मॉडेल आहे. तिने 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. बिग बॉसच्या आठव्या पर्वातून तिला खरी ओळख मिळाली.
कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात सर्व खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्ठपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही प्रेयसी नताशासह घरीच वेळ घालवत आहे.