नवी दिल्ली -२०२० हे वर्ष कोरोनामुळे गाजले. या विषाणूमुळे क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसला. त्यात क्रिकेटच्याही मालिका रद्द आणि स्थगित करण्यात आल्या. मार्चमध्ये सुरू होणारे आयपीएल सप्टेंबरपासून खेळवण्यात आले. मात्र ही सर्व कसर आता २०२१ मध्ये भरून निघणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील 'पॉवरपॅक' कार्यक्रम जाहीर केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप संघाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, वृत्तानुसार, २०२१ मध्ये भारतीय संघाला १४ कसोटी, १६ एकदिवसीय सामने आणि २३ टी-२० सामने खेळायचे आहेत. यामध्ये आशिया चषक, कसोटी अजिंक्यपद अंतिम आणि टी-२० विश्वचषक वगळण्यात आला आहे.
हेही वाचा -आता फक्त हॅमिल्टन नव्हे, तर 'सर' लुईस हॅमिल्टन
सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचे दोन सामने अद्याप बाकी असून या दौऱ्यानंतर संघ मायदेशी परतणार आहे. या महिन्यात इंग्लंडचा संघ मोठ्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. उभय संघात प्रथम ४ सामन्यांची कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
टीम इंडिया आणि २०२१ :
- जानेवारी : वर्षाची सुरुवात सिडनी कसोटीने
भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात फेब्रुवारीमध्ये इंग्लंड दौर्यापासून होईल. यावर्षी भारतीय संघाला आशिया चषक आणि टी -२० वर्ल्डकप देखील खेळायचा आहे. हा वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्येच भारत आयोजित करण्यात येणार आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. जेथे दोन संघांमधील ४ कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. वर्षाचा पहिला सामना भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी कसोटी सामन्याद्वारे खेळणार आहे. हा सामना ७ जानेवारीपासून सुरू होईल. मालिकेची शेवटची कसोटी १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेनमध्ये होईल.
- फेब्रुवारी ते मार्च : इंग्लंडचा भारत दौरा
इंग्लंडचा संघ फेब्रुवारीमध्ये भारताचा दौरा करेल. येथे दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी, ५ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळल्या जातील. हा दौरा ५ फेब्रुवारीपासून चेन्नई कसोटीपासून सुरू होईल. शेवटचा सामना २८ मार्च रोजी पुण्यात खेळला जाईल.
- मार्च-एप्रिल : अफगाणिस्तानचा भारत दौरा
मार्चच्या अखेरीस अफगाणिस्तान संघ भारत दौर्यावर येईल. येथे त्यांना टीम इंडियाबरोबर ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आयपीएलच्या अगदी आधी ही मालिका खेळली जाईल.
- एप्रिल-मे : आयपीएल २०२१