मुंबई - टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालिम म्हणून पहिले जात असलेल्या मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-२ ने धुव्वा उडवला. उभय संघात झालेल्या १८ सामन्यातील भारताचा हा १०वा विजय आहे. भारतीय संघ टी-२० प्रकारात दोन वर्षांपासून अजिंक्य आहे. भारताचा हा सलग सहावा मालिका विजय आहे.
टी-२० मालिकेत टीम इंडियाचा 'विजय रथ'
- बांगलादेशचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०१९, भारत २-१ ने विजयी
- वेस्ट इंडीजचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०१९, भारत २-१ ने विजयी
- श्रीलंकेचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत २-० ने विजयी
- भारताचा न्यूझीलंड दौरा: पाच सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत ५-० ने विजयी
- भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत २-१ ने विजयी
- इंग्लंडचा भारत दौरा: पाच सामन्याची टी-२० मालिका २०२१, भारत ३-२ ने विजयी
इंग्लंडचा संघ मागील ९ वर्षांपासून भारतामध्ये टी-२० मालिका जिंकू शकलेला नाही. इंग्लंडने भारताला ऑक्टोबर २०११ मध्ये पराभूत केलं होतं.