महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कौतुकास्पद..! अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या - क्रिकेट विषयी बातम्या

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघातील पहिला सामना टी-२० सामना पाहण्यासाठी मुगुनथन निघाला होता. मुगुनथन आपल्या मित्रासोबत कोईम्बतूर ते धर्मशाला हा जवळपास ३ हजार किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करणार होता. तेव्हा रस्त्यात त्याचा अपघात झाला. त्याला त्वरितच रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना हार्दिक पांड्याला कळली तेव्हा त्याने आपल्या चाहत्याचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.

कौतुकास्पद..! अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या

By

Published : Sep 26, 2019, 8:30 PM IST

चेन्नई - क्रिकेटवेड्या भारतात आपल्या आवडत्या खेळाडूंना चिअर करण्यासाठी चाहते नेहमी काहीही करण्यास तयार असतात. यात क्रिकेटपटूंचे जबरे फॅनही काही कमी नाहीत. याचे उत्तम उदाहरण सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा चाहता सुधीर गौतम याचे देता येईल. ही यादी मोठी असून या यादीत मुगुनथनच्या रुपाने भर पडली आहे. मुगुनथन हा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा मोठा चाहता आहे.

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघातील पहिला सामना टी-२० सामना पाहण्यासाठी मुगुनथन निघाला होता. मुगुनथन आपल्या मित्रासोबत कोईम्बतूर ते धर्मशाला हा जवळपास ३ हजार किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करणार होता. तेव्हा रस्त्यात त्याचा अपघात झाला. त्याला त्वरितच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा -'...अन् मी सलामीवीर बनलो', वाचा सचिनची कहाणी...

अपघातामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. म्हणून डॉक्टरांनी त्वरित सर्जरी करण्याचा सल्ला दिला. ही घटना हार्दिक पांड्याला कळली तेव्हा त्याने आपल्या चाहत्याचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उपचारानंतर २१ सप्टेंबरला मुगुनथन पुन्हा त्याच्या घरी कोईम्बतूरला परतला आहे.

मुगुंनथन हा हार्दिक पांड्याचा मोठा चाहता असून, त्याने आपल्या शरीरावर १६ विविध भाषांमध्ये हार्दिकचे नाव गोंदवून घेतले आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिकने केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा मुगुनथन याने मुंडन करत पुन्हा एकदा हार्दिकने भारतीय संघात पुनरागमन करावे, यासाठी देवाकडे साकडे घातले होते. नेहमी आपल्या हेअरस्टाईलच्या चर्चेत असलेल्या हार्दिक पांड्याची हेअरस्टाईल कॉपी मुगुनथन हाही करतो.

हेही वाचा -आयपीएल प्रेमींसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात होणार लिलाव

ABOUT THE AUTHOR

...view details