महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विक्रमांचा धनी विराट कोहली 'या' विषयात आहे 'ढ', स्वतःच दिली कबुली - kohli

विराट कोहलीने एका अमेरिकी टीव्ही शोदरम्यान, अमेरिकेचे क्रीडा पत्रकार ग्राहम बेनसिंगर यांच्याशी दिलखुलास बातचित केली. यावेळी त्याने आपल्या जीवनातील पर्सनल गोष्टीवरही भाष्य केले. या बातचित दरम्यान विराटने सांगितले की, मी गणित विषयात 'कच्चा' असून मला गणित कळत नाही, याची कबुली दिली आहे.

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

By

Published : Sep 8, 2019, 5:50 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने, क्रिकेटच्या मैदानात अनेक परीक्षा यशस्वीरित्या पास केल्या आहेत. त्याने दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीचे अनेक पुरस्कार आणि रेकार्ड आपल्या नावे केले आहेत. मात्र, अद्यापही विराट कोहली एका विषयात 'ढ' असून त्याने स्वतःच याची कबुली दिली आहे.

विराट कोहलीने एका अमेरिकी टीव्ही शोदरम्यान, अमेरिकेचे क्रीडा पत्रकार ग्राहम बेनसिंगर यांच्याशी दिलखुलास बातचित केली. यावेळी त्याने आपल्या जीवनातील पर्सनल गोष्टीवरही भाष्य केले. या बातचित दरम्यान विराटने सांगितले की, मी गणित विषयात 'कच्चा' असून मला गणित कळत नाही, याची कबुली दिली आहे.

विराट म्हणाला की, 'परीक्षेत गणिताचा पेपर हा १०० मार्कांचा असायचा, मला जेमतेम गुण मिळत असत. कधी कधी तर मला फक्त ३ गुणही मिळत असे. मला त्यावेळी कळल नव्हते की, गणिताचा अभ्यास का केला जातो. मला गणित काही कळत नव्हते. मी कधीही गणिताचे फॉर्मुले जीवनात अंमलात आणले नाहीत. मला काही करुन १० वी पास व्हायचे होते आणि गणितापासून कायमची सुटका करुन घ्यायची होती.'

पुढे बोलताना विराट म्हणाला, १० वी पास होऊन मी माझ्या आवडीचे विषय घेऊ इच्छित होतो. यासाठी मी अमाप कष्ट घेतले. एवढे कष्ट मी क्रिकेटसाठीही घेतले नाही, असं विराटनं सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details