महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

४ सामन्यात फक्त ३४ धावा!..वाचा बाराबती स्टेडियमवर कॅप्टन कोहलीचा इतिहास - बाराबती स्टेडियमवर कोहलीचा इतिहास न्यूज

कटकच्या या मैदानावर कोहलीने आतापर्यंत चार सामन्यात फक्त ३४ धावा केल्या आहेत. ३, २२, १ आणि ८ धावा अशी कोहलीने चार सामन्यांत केलेली कामगिरी आहे.

indian captain virat kohli records at barabati cricket stadium
४ सामन्यात फक्त ३४ धावा!..वाचा बाराबती स्टेडियमवर कॅप्टन कोहलीचा इतिहास

By

Published : Dec 21, 2019, 9:42 PM IST

कटक -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम सर केले. 'रनमशीन' असे बिरूद मिरवणारा कोहली कटकच्या बाराबती मैदानावर मात्र सपशेल अपयशी ठरला आहे.

हेही वाचा -आबिद अलीची गाडी सुसाट, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच पाकिस्तानी!

कटकच्या या मैदानावर कोहलीने आतापर्यंत चार सामन्यात फक्त ३४ धावा केल्या आहेत. ३, २२, १ आणि ८ धावा अशी कोहलीने चार सामन्यांत केलेली कामगिरी आहे. सध्या सुरू असलेल्या या मालिकेत कोहलीला चांगली खेळी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात ४ धावा तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. त्याने वनडेमध्ये सर्वात वेगवान दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने २०५ सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना उद्या रविवारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात विंडीजने आठ विकेट्सने विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली. पण, त्यानंतरच्या विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत १०७ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details