महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

#HBDJaspritBumrah : आईचा ओरडा खाल्यामुळे बुमराह ठरला 'यॉर्कर किंग' - जसप्रीत बुमराह वाढदिवस न्यूज

यॉर्कर, स्लोअर, बाउन्सर, स्विंग, वेग अशा अनेक कौशल्याने परिपूर्ण असलेल्या बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबादमध्ये झाला. अवघ्या सात वर्षाचा असताना बुमराहने आपल्या वडिलांना गमावले. त्यानंतर त्याच्या आईने क्रिकेटच्या स्वप्नपूर्तीसाठी बळ दिले.

indian bowler jasprit bumrah celebrating 26th birthday today
#HBDJaspritBumrah : आईचा ओरडा खाल्यामुळे बुमराह ठरला 'यॉर्कर किंग'

By

Published : Dec 6, 2019, 4:19 PM IST

मुंबई -प्रतिस्पर्धी संघाला सहा चेंडूत सहा धावांची गरज असेल तर, तुम्ही कोणाला गोलंदाजी करायला द्याल? असा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या तोंडात हमखास एकच नाव येते. ते म्हणजे 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह. अवघ्या तीन वर्षात फलंदाजांमध्ये भय निर्माण करणाऱ्या जसप्रीत बुमराहचा आज २६ वा वाढदिवस आहे.

हेही वाचा -दिल्ली कॅपिटल्समध्ये गौतम गंभीर करू शकतो पुनरागमन...

यॉर्कर, स्लोअर, बाउन्सर, स्विंग, वेग अशा अनेक कौशल्याने परिपूर्ण असलेल्या बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबादमध्ये झाला. अवघ्या सात वर्षाचा असताना बुमराहने आपल्या वडिलांना गमावले. त्यानंतर त्याच्या आईने क्रिकेटच्या स्वप्नपूर्तीसाठी बळ दिले. आयपीएलसारख्या धनाढ्य स्पर्धेत बलाढ्य फलंदाजांसमोर बुमराहने स्वत:ला नुसतं सिद्धच केलं नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा मानही पटकावला.

बुमराहच्या आयुष्याशी संबंधित अनेक अनोखे किस्से आहेत. घरात आवाज होऊ नये आणि आईचा ओरडा मिळू नये, म्हणून बुमराह क्रिकेटचा चेंडू भिंतीच्या खालच्या भागाच्या काठावर फेकत असे. या सवयीमुळे त्याने यॉर्करचे अस्त्र अंगी बाणवले आणि क्रिकेटमध्ये हवे तसे वापरले. अचूक यॉर्कर टाकणारा बुमराह सध्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र, तो लवकरच गोलंदाजीचा ताफा सांभाळेल यात शंका नाही.

बुमहराहने ५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०३ विकेट, १२ कसोटी सामन्यांमध्ये ६२ विकेट आणि ४२ टी-२० सामन्यांत ५१ बळी मिळवले आहेत. २०१६ मध्ये बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमधील बुमराहचा पहिला बळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ होता. तर, कसोटीत त्याचा पहिला बळी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स होता. आयपीएलमधील बुमराहचा पहिला बळी दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा कर्णधार विराट कोहली आहे.

जगातील पदार्पण वर्षात सर्वाधिक बळी घेणाऱ्या विक्रमात बुमराह तिसऱ्या स्थानी आहे. बुमराहने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. या हंगामात त्याने केवळ दोन सामने खेळले परंतु त्यानंतर, आणि आत्तापर्यंत आपल्या आगळ्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीने त्याने सर्वांना प्रभावित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details