लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला आणखी एक धक्का बसला आहे. शिखर धवनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेबाहेर पडला. त्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यालाही दुखापत झाली. त्यानंतर आता अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अष्टपैलू विजय शंकरला सरावादरम्यान दुखापत झाली आहे.
ICC WC 2019 : भारताला तिसरा धक्का; विजय शंकरला दुखापत
शिखर धवनला दुखापत झाल्याने, तो स्पर्धेबाहेर पडला असताना आता अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाली आहे.
भारतीय संघ नेटमध्ये सराव करत होता. तेव्हा सराव्यादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा यार्कर अष्टपैलू विजय शंकरच्या पायाला लागला. यामुळे शंकरला दुखापत झाली आहे. दरम्यान, विजय शंकरची दुखापत गंभीर नसल्याचे बोलले जात आहे.
अष्टपैलू विजय शंकरने पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात गोलंदाजी करताना आपल्या पहिल्याच चेंडूत गडी बाद केला होता. त्याने इमान-उल-हक आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा बळी घेतला होता. शंकर भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असून त्याला झालेली दुखापत गंभीर असल्यास हा भारताला मोठ्ठा धक्का मानला जात आहे.