मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघ जवळपास एक वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी भारत दौरा करणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक आणि भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघात ५ सामन्याची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. हे सर्व सामने लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.
उभय संघातील मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. सात मार्च ते १७ मार्च या दरम्यान, एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. तर २० ते २३ मार्च या दरम्यान, टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- ७ मार्च पहिला एकदिवसीय सामना
- ९ मार्च दुसरा एकदिवसीय सामना
- १२ मार्च तिसरा एकदिवसीय सामना
- १४ मार्च चौथा एकदिवसीय सामना
- १७ मार्च पाचवा एकदिवसीय सामना
(सर्व सामने लखनऊमध्ये होणार आहेत)
भारत-आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक
- २० मार्च पहिला टी-२० सामना
- २१ मार्च दुसरा टी-२० सामना
- २३ मार्च तिसरा टी-२० सामना
(सर्व सामने लखनऊमध्ये होणार आहेत)
- असा आहे भारतीय महिला एकदिवसीय संघ -
- मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधाना, जेमिमाह रोड्रिग्ज, पूनम राउत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), डी. हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक) , श्वेता वर्मा (यष्टीरक्षक), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रथ्युषा आणि मोनिका पटेल.
- असा आहे भारतीय महिला टी-२० संघ
- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, हरलीन देओल, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), नुजहत परवीन (यष्टीरक्षक) आयुषी सोनी, अरुंधति रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रथ्युषा आणि सिमरन दिल बहादुर.