महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताचा  इंडीजवर 257 धावांनी विजय; गोलंदाजांची कामगिरी निर्णायक - कसोटी मालिका

भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघावर तब्बल 257 धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्त्वपुर्ण ठरली असून रविंद्र जडेजा व मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर इशांत शर्माने व बुमराहने 1 गडी बाद केला.

india wins test

By

Published : Sep 3, 2019, 1:43 AM IST

Updated : Sep 3, 2019, 11:35 AM IST

किंगस्टन -भारताने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघावर तब्बल 257 धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्त्वपुर्ण ठरली असून रविंद्र जडेजा व मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर इशांत शर्माने व बुमराहने 1 गडी बाद केला.

हनुमा विहारीच्या कारकिर्दीतील पहील्या शतकी कामगिरी व बुमराहच्या हॅट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतीक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱया दिवशी इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे भारताने 299 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषीत केला. इंडिजला आता 467 धावा पार करणे गरजेचे होते. मात्र, भारताने 210 धावांतच वेस्ट इंडिजला धूळ चारली आणि तब्बल 257 धावांनी भारताने विजय मिळवला आणि 2-0 ने मालिकाही खिशात घातली. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवल्याने विराटचे फॅन आणखीणच आनंदी झाले आहेत.

Last Updated : Sep 3, 2019, 11:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details