महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CW IND VS AFG : अफगाणिस्तानने दाखवला लढाऊ बाणा..परंतु अखेर शमीच्या हॅट्ट्रिकने विजय भारताचाच

भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने हॅट्ट्रिकसह ४ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

CW IND VS AFG : अफगाणिस्तानने दाखवला लढाऊ बाणा..परंतू अखेर शमीच्या हॅट्ट्रिकने विजय भारताचाच

By

Published : Jun 22, 2019, 2:47 PM IST

Updated : Jun 22, 2019, 11:55 PM IST

साऊदम्पटन - तुलनेत नवख्या असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला २२४ धावांवर रोखल्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नाबीने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण, तो अपयशी ठरला. भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने हॅट्ट्रिकसह ४ बळी घेतल्याने भारताचा पराभव टळला.

शमीच्या हॅट्ट्रिकने भारताचा विजय

अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात संथ झाली. मोहम्मद शमीने सलामीवीर हजरतुल्लाह झझाईचा त्रिफळा उडवत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर ठराविक अंतराने अफगाणिस्तानचे फलंदाज बाद होत गेले. रहमत शाहाने ३६ आणि नाबीने ५२ धावा करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला पण त्यांना अपयश आले. भारताकडून मोहम्मद शमीला ४, तर युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.

अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नाबीने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

त्याअगोदर या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने ६७ तर केदार जाधवने ५२ धावा केल्या. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताला २२४ धावांमध्ये रोखले. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नाईब आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी २ तर रशीद खान, मुजीब उर रहमान, अफताब आलम आणि रहमत शाह यांनी १-१ विकेट घेतला.

Last Updated : Jun 22, 2019, 11:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details